गुरुचरित्र
श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे सरस्वती गंगाधर हे श्रीनृसिंहसरस्वतींचे एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश होतो. सायंदेव -> नागनाथ ->देवराव -> गंगाधर -> सरस्वती गंगाधर अशी वंशावळ गुरुचरित्र देते. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. [२] इ. स. १४८० च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असे मानले जाते. [३] ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर हे आपस्तंब शाखेचे ब्राह्मण होते आणि त्यांचे आडनाव साखरे असे होते असे या ग्रंथात लिहिलेले आढळून येते. [३] महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात विशेषत: कर्नाटकात दत्त संप्रदायाचा विशेष प्रसार आहे. या मूळ मराठी पद्यरूपात असलेल्या श्र...
Comments
Post a Comment