Posts

facebook

आरोग्य म्हणजे काय

  प्रस्तावना आरोग्य किंवा तब्येत हा शब्द असा आहे की त्याचा अर्थ काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित असते पण ते नक्की शब्दात सांगता येत नाही. आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात. असेही म्हणता येईल की जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात आणि आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे करू शकतो. आरोग्य किंवा तब्येत म्हणजे काय तर जेव्हा शरीर, मन आणि समाज हे तीनही व्यवस्थित असतात. आरोग्यासाठी शरीरही निरोगी हवे, मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थिती देखील चांगली असावी. चांगली तब्येत किंवा आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही तर आनंदी आणि सुखी जीवन शक्य व्हावं अशी शरीराची आणि मनाची अवस्था. भक्कम / धडधाकट शरीर म्हणजे ज्यावेळी शरीर संपूर्णपणे काम करण्यास योग्य असते. उदाहरणच दयायचे झाले तर, घरातील कंदील, कंदिलाची कडी, काच किंवा वाट जास्त करण्याचा स्क्रू खराब असला तरीही तो कंदील आपण वापरू शकतो पण त्यातला एखादा भाग बिघडलेला असेल तात तो कंदील संपूर्णपणे कार्यक्षम आहे असे म्हणता येईल का? अगदी असंच आपल्या शरीराचे पण असते. एखादा अवयव नीट

आपली भारतीय शिक्षण पद्धती

Image
  भारतीय शिक्षणपद्धतीची जडणघडण प्रस्तावना विकसित देशांचा विकास शिक्षणाच्याच मार्फत झाला. सध्या मानवी संसाधन विकासासाठी ‘शिक्षण’ हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. राष्ट्रीय विकास करायचा असेल तर भौतिक साधनसंपत्तीपेक्षा सर्वात महत्त्वाची साधनसंपत्ती म्हणजे मानव! ज्याप्रमाणे कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असल्याशिवाय ती इमारत मजबूत असू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस व शिक्षण या दोन्ही बाजू विकसित झाल्याशिवाय राष्ट्रविकास होऊ शकत नाही. मानव संसाधन विकासासाठी विविध कार्यक्षेत्रं पाहावयास मिळतात. उदा. शैक्षणिक, वैज्ञानिक, आíथक, धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक, सांस्कृतिक इ. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे एक हत्यार आहे. उत्कृष्ट नागरिक हा शिक्षणाच्या माध्यमातून घडवता येतो. ‘भावी सक्षम नागरिक’ घडवण्यास शिक्षण मदत करत असते. त्यामुळे शिक्षणाचा पाया म्हणजेच प्राथमिक शिक्षणापासून विचार करू.  सर्व शिक्षणाचा आधारस्तंभ या भूमिकेतून प्राथमिक शिक्षणाकडे पाहिलं जातं. म्हणूनच भारतीय घटनेमध्ये वय वष्रे ६ ते १४ वयोगटांतील मुलांना मोफत सक्तीचे व सार्वत्रिक शिक्षण केले आहे. ब्रिटिशांच्या काळात जेवढा विकास पा

गुरुचरित्र

Image
श्री गुरुचरित्र  हा  श्रीदत्तात्रेयाचे  अवतार मानल्या जाणाऱ्या  श्रीनृसिंहसरस्वती  यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे सरस्वती गंगाधर हे  श्रीनृसिंहसरस्वतींचे  एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश होतो. सायंदेव -> नागनाथ ->देवराव -> गंगाधर -> सरस्वती गंगाधर अशी वंशावळ गुरुचरित्र देते. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. [२]  इ. स. १४८० च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असे मानले जाते. [३]  ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर हे आपस्तंब शाखेचे ब्राह्मण होते आणि त्यांचे आडनाव साखरे असे होते असे या ग्रंथात लिहिलेले आढळून येते. [३]   महाराष्ट्र  आणि  दक्षिण भारतात  विशेषत:  कर्नाटकात  दत्त संप्रदायाचा विशेष प्रसार आहे. या मूळ मराठी पद्यरूपात असलेल्या श्रीगुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री  वासुदेवानंद सरस्वती